*कोकण Express*
*कासार्डेतिल बहुचर्चित दहिहंडी फोडण्याचा मान जय हनुमान पथक राजापूर ने पटकावला*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कासार्डेतील दहीहंडीची गर्दी पाहता मुंबई आणि पुणे सारखा अनुभव आपल्याला मिळतो. जठार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे असे वातावरण पाहयला मिळत असून मी त्याचे या भागातील आमदार म्हणून अभिनंदन करतो.अतिशय उत्तम नियोजनात ही दहीहंडी दरवर्षी पार पाडते हे घडविने जठार साहेबांना शक्य असल्याने त्याना हे सर्व श्रेय देतो. मी गोविंद पथकांना एवढेच सांगेन उत्साहाबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घ्या. महाराष्ट्र सरकारने गोविंद पथकासाठी विम्याची योजना आणली आहे.तसेच गोविंद पथाकासोबत महाराष्ट्र सरकार सोबत आहे असे प्रतिपादन आम. नितेश राणे यानी कासार्डे येथे केले.
बोल बजरंग बली की जय, ढाक्कुमाक्कुम,गोविंदा आला रेच्या जयघोषाने तसेच डी.जे.,ढोलपथक व आर्केस्ट्राच्या तालावर कासार्डे तिठ्ठा येथिल प्रमोद जठार मित्रमंडळाची दहीहंडी उत्सवात उपस्थितांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी एक लाख अकरा हजार एकशे अकरा व कोकण दूध चषकाचा मान मिळवत सहा थर लावून हनुमान प्रसन्न गोविंदा पथक राजापूर खडपेवाडी यानी दहीहंडी फोडली. रात्री उशिरा फोडण्यात आलेल्या या दहीहंडी पथकास आम नितेश राणे, भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख तथा मा.आम. प्रमोद जठार व मान्यवरांच्या शुभहस्ते गोविंदा पथकाला गौरविण्यात आले.
मंडळाच्या अकराव्या वर्षी रत्नागिरी व सिंधुदुर्गातील गोंविदा पथकानी हजेरी लावत पुन्हा एकदा तोच जोश दाखवून दहीहंडी उत्सवात वेगळी रंगत आणली. तत्पूर्वी कासार्डेतील प्रमोद जठार याच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव,सौ. निरजा जठार, शिडवणे सरपंच रविंद्र शेटये, तंटामुक्त अध्यक्ष संजय नकाशे,ओझरम उपसरपंच प्रशांत राणे,बबलू सावंत, रज्जाक बटवाले,दादा घाडी, बाबू घाडी, उल्हास पाताडे, शरद शेलार, रोहित महाडिक, राजू कदम, सहदेव म्हस्के, संदिप बांदिवडेकर याच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जसजशी रात्र झाली तेव्हापासून गर्दीचा उच्चांक वाढत गेला.
यावेळी राजापूर विधानसभा प्रमुख उल्का विश्वासराव,अनिल करंगुटकर,माजी जि.प.सदस्य संजय देसाई, माजी सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार,सुधीर नकाशे,माजी सं.स. सभापती प्रकाश पारकर,हर्षदा वाळके, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, देवगड मंडळाध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजपा शोशल मिडीयाध्यक्ष समीर प्रभुगावकर, याच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा,युवामोर्चा पदाधिकारी,माजी जि.प.,पं.स. सदस्य, नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक, आजी व माजी सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य,मंडल, शक्तीप्रमुख यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
सायंकाळनंतर दहीहंडी उत्सवाला वेगळीच रंगत आली होती. यावेळी रत्नागिरी,सिंधुदुर्ग मधील गोविंदा पथकांनी हजेरी लावत सलामी दिली.ढोल ताशाच्या गजरासह,डी.जे. व कोल्हापूर आकेरस्ट्राच्या कलाकारांनी हिंदी मराठी गाणी सादर करत एकच रंगत आणली.शेवटी हनुमान प्रसन्न गोविंदा पथकांने सहा थरांची सलामी देत एक लाखांची दहीहंडी फोडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख रक्कमेसह कोकणदूध चषक देऊन गौरविण्यात आले.यावेळी मान्यवरांसह मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते. यावेळी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,आरोग्य, कला व क्रीडासह सर्व क्षेत्रातील व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमचे सूत्रसंचलन राजा सामंत,अमोल जमदाडे यानी केले. कार्यक्रासाठी यशस्वीतेसाठी प्रमोद जठार मित्रमंडळाच्या सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.
*आम. नितेश राणे जिल्हाचे पालकमंत्री होणार- प्रमोद जठार*
आज श्रीकृष्णाचा वाढदिवस साजरा करताना चिंतनही झाले पाहिजे.यासाठिच आपण सर्वजण एकत्र आली असून आमदार नितेश राणेही उपस्थित आहे. आमदार साहेब पुन्हा येणा-या निवडणूकीत प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत आणि याच जिल्हाचे पालकमंत्री होणार आहेत असे सूतोवाच करत खास त्याच्यासाठी डाॅन या गाण्याचे सादरीकरण करण्याचे माजी आमदार प्रमोद जठार यानी मनोगतात सांगितले.