प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत वनभाजा प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे शिडवणे कोनेवाडी शाळेत आयोजन

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत वनभाजा प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे शिडवणे कोनेवाडी शाळेत आयोजन

*कोकण Express*

*प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत वनभाजा प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे शिडवणे कोनेवाडी शाळेत आयोजन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

जि प प्रा शाळा शिडवणे कोनेवाडी शाळेत प्रधानमंत्री रोशन शक्ती निर्माण योजनेअंतर्गत वनभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा आयोजन करण्यात आले होते, पाककृती स्पर्धेत अनेक पालक महिला ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती सादर केल्या, यावेळी परीक्षक म्हणून सन्माननीय पाताडे सर आणि केंद्रप्रमुख सन्माननीय संजय पवार सर यांनी मोलाचे सहकार्य केले . पाककृतीच्या चवीचा सर्व सदस्यांनी आस्वाद घेतला. विजेत्याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले याचवेळी वनभाज्या प्रदर्शन ही आयोजित केले होते, परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या फळभाज्या यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी भरवले होते यात टाकळा, माठ, शेपू कोथिंबीर, कुरडू, पेवगा, बांबू, केळभाजी , शेवगा, भोपळा, करटोली, कुडा, भारंगी, सुरण, अळू अशा विविध प्रकारच्या भाज्या प्रदर्शन भरवले होते, प्रत्येक भाजीची उपयुक्तता व माहिती सोप्या शब्दात मुलांनी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाच्या वेळी शिडवणे गावचे उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय दीपक पाटणकर व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, पालक, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!