सेवा परीवार – वेंगुर्ला व कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ – तुळस च्या वतीने आरोग्य शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण

सेवा परीवार – वेंगुर्ला व कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ – तुळस च्या वतीने आरोग्य शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण

*कोकण Express*

*सेवा परीवार – वेंगुर्ला व कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ – तुळस च्या वतीने आरोग्य शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण*

सेवा परीवार आणि कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ , तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथे आज मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी या शिबिराचा ६३ जणांनी लाभ घेतला तसेच यावेळी
रुग्णवाहिका लोकार्पणही प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
डॉ.राजन शिरसाठ आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले तालुक्यात एक अत्याधुनिक रुग्णवाहिका असावी जेणेकरून गरीब गरजू रुग्णांसाठी अत्यल्प खर्चात सोय होईल , त्यासाठी डॉ.राजन शिरसाठ यांनी मुंबईतील दात्यांशी संपर्क करुन आर्थिक तरतूद केली , त्याच निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी मुंबई येथील सर्जन अँड गायनॅकॉलॉजिस्ट डॉक्टर दिलीप राय चूरा फिजिशियन अक्नोक्नॉलॉजीस्ट डॉक्टर दिलीप पवार , डॉक्टर राजन शिरसाट , भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , प्रदेश कार्यकारणी सचिव शरद चव्हाण , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल व बाळा सावंत , तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णू उर्फ पपु परब , माजी नगरसेवक साक्षी पेडणेकर व प्रशांत आपटे , कवी अजित राऊळ , तुळस माजी सरपंच शंकर घारे , रवींद्र शिरसाट , कीर्तनकार चंद्रशेखर अभ्यंकर , सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावले , माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत , जयंत मोंडकर , सुनील नांदगावकर , व्यापारी संघाचे अशोक ठोंबरे , कुंभारटेंब मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल , जेष्ठ नागरिक अनंत आठले , डॉक्टर सौ. शिरसाट राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांत सहकार्यवाह पदमजा अभ्यंकर ,
साहस प्रतिष्ठान च्या रुपाली पाटील , विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद पिंजाणी , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , राहुल वरस्कर , सायमन अल्मेडा, डॉ.दर्शेश पेठे , मनवेल फर्नांडिस , अमोल आरोसकर आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारत मातेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांत कांदिवली मार्फत भारत माता व शिवाजी महाराज प्रतिमा उपस्थितांना देण्यात आला .यावेळी डॉक्टर दिलीप रायचुरा व डॉक्टर दिलीप पवार यांचा डाॅ . राजन शिरसाठ यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी डॉ. पवार , डॉक्टर शिरसाट आदींनी मार्गदर्शन केले .यावेळी सेवा गीत सादर करण्यात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय रेडकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!