सनातन हिंदू धर्मा विरोधात गरळ ओखणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांची मुकसंमती

सनातन हिंदू धर्मा विरोधात गरळ ओखणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांची मुकसंमती

*कोकण Express*

*सनातन हिंदू धर्मा विरोधात गरळ ओखणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांची मुकसंमती*

*सनातन हिंदू धर्म म्हणजे एड्स असे बोलणाऱ्या ए.राजा यांचा आमदार नितेश राणेंनी घेतला खरपूस समाचार*

*सनातन हिंदू धर्मा विरोधात बोलणाऱ्यांच्या लुंगीत कशी आग लावायची ते आम्हालाच माहित ;दिला इशारा*

*हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून हिम्मत असेल तर भूमिका मांडा*

*भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांचे आव्हान

*कणकवली ः प्रतिनिधी*

इंडिया आघाडीतील पक्षाचा हिंदू सनातन विरोधी खरा चेहरा दिसला आहे. डीएमके पक्षाचे एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा सनातन धर्माबद्दल बरळला तर पी चिदंबरम,आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मुल सुद्धा सनातन हिंदू धर्माबद्दल खालच्या भाषेत टीका करत आहे. ए.राजा याने तर सनातन हिंदू धर्म म्हणजे एड्स आहे. अशी गंभीर टीका करून भाजप विरोधी आघाडीत आणि राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकान मध्ये हिंदू सनातन धर्माला कोठेच स्थान नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करून दीलेआहे. असे असताना मल्लिकार्जुन खरगे यांचे धोतर सांभाळणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या घटनेची चीड येत नाही काय ? मग त्यांचे हिंदुत्व कोणत्या प्रकारचे आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खऱ्या अर्थाने पुत्र असतील तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट करून आणि इंडिया आघाडीतील सनातन हिंदू धर्मावर टीका करणाऱ्याना उत्तर द्यावे असे आव्हान भाजपचे नेते प्रवक्ते आमदार नितेश राणे दिले.
उद्धव ठाकरे यांची सनातन हिंदू धर्मावरील टीकेनंतर कोणतीच प्रतिक्रिया न येणे यावर आमदार नितेश राणे यांनी कणकवली येते ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना जोरदार टीका केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका मान्य नाही काय ? असा सवाल करतानाच ज्या मातोश्रीवर आजपर्यंत सर्वात जास्त सनातन हिंदू धर्माविषयी समर्थन मिळाले त्याच मातोश्रीवर मूग गिळून गप्प राहण्याची आज वेळ आली याचाच अर्थ तुम्ही तुमचे हिंदुत्व विसरलात किंवा या मातोश्रीवर ए राजा यांच्या वक्तव्याप्रमाणे सर्वात जास्त एचआयव्हीचा प्रसार झाला असे आम्ही समजायचे काय असाही सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.सनातन हिंदू धर्माला कोणी वाकड्या नजरेने पाहू नये. जर सनातन हिंदू धर्माचा अपमान कोण करत असेल तर त्याच्या लुंगीत कशी आग लावायची हे आम्हाला बऱ्यापैकी माहित आहे असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला.
संजय राऊत लवकरच जेल मध्ये जाणार आहे. खिचडी चोर म्हणून संजय राऊत यांची गणना झालेली आहे. खिचडी मधील पैसे राऊत यांच्या मुलीच्या खात्यात आलेत आणि याबाबतची माहिती खासदार किरीट सोमय्या हे देणारच आहेत त्यामुळे संजय राऊत हे जेलमध्ये असतील म्हणूनच ते सध्या तोंड लपवून फिरत आहे अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
बॉक्स
राणे समितीच्या अहवालनुसार माजी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने जसे आरक्षण दिले होते तसे देणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समितीने जे आरक्षण दिले. जो अहवाल दिला तो मराठ्यांच्या मागासलेपणाचा अभ्यास करून स्वतंत्र मराठा आरक्षणाचा होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या अहवालाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे भविष्यात सुद्धा स्वतंत्र रीत्या मराठा आरक्षण कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मिळेल आणि महायुतीचे सरकार ते देईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कोरोना काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेले रुग्णालयांमध्ये गेले गावागावात गेले जनतेची काळजी वाहिली. मात्र तुम्ही घर कोंबड्याप्रमाणे मातोश्रीवरच बसून राहिला. पूर्वी जी आश्वासने दिलेली त्या शेतकऱ्यांच्या आश्वासने मुख्यमंत्री असताना पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री काळात काय केले हे आधी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगावे. धनगर समाजानेही चिंता करू नये त्यांनाही योग्य पद्धतीने आरक्षण मिळणार असेही एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!