आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा:-वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा:-वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत

*कोकण Express*

*आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा:-वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत*

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभववाडी तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने*

*खांबाळे गावातील इयत्ता दहावी-बारावी परीक्षेत सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विध्यार्थीनींचा सत्कार समारंभ संपन्न.*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

शिक्षण घेत असताना जिद्द व चिकाटी अत्यंत महत्वाची आहे. तुमचा पाया भक्कम आहे.फक्त अभ्यास करून सतत वाचन करत रहा.आई-वडिलांचे कष्ट नजरेसमोर ठेवून विविध स्पर्धा परीक्षेंना सामोरे जा यश निश्चित मिळेल. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी स्वप्न पाहिलेले असते. ते स्वप्न पूर्ण करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे प्रतिपादन वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत यांनी केले.*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभववाडी तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने खांबाळे गावातील इयत्ता दहावी-बारावी परीक्षेत सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विध्यार्थीनींचा सत्कार करून मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाले.*
*यावेळी केंद्रशाळेचे शिक्षक यशवंत कांबळे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.*
*यावेळी मंगेश लोके,सरपंच गौरी पवार,उपसरपंच गणेश पवार,सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुरव,प्राजक्ता कदम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके,ग्रामसेवक नयना गुरखे,सुनिल पवार,प्रभाकर पवार,महादेव पवार,अरुण माळकर,दिनेश पालकर, गणेश सदाशिव पवार,जयेश पवार,सुर्यकांत सुतार, रोहित पवार आदी मान्यवर ग्रामस्थ व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!