*कोकण Express*
*कणकवली तालुका दुचाकी मॅकेनिकांचे व संघटनेचे कार्य कौतुकास्पद- तहसिलदार दिक्षांत देशपांडे*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळागाळात जाऊन दुचाकी वाहन दुरुस्त करणे ही सर्वसामान्यांसाठी असलेली सेवा, कणकवली तालुक्यातील हे दुचाकी मेकॅनिक करत आहेत. सर्व मेकॅनिक एकत्र येत असोसिएशन स्थापन करणे हे ग्रामीण भागात अभिमानास्पद असल्याचे पहिलेच पहात आहोत.
शिवाय विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेची एक प्रकारे सेवा करत असल्याचे पाहून फार अभिमान वाटत आहे. असेच कार्य तुमच्या हातून उत्तरोत्तर घडत जावो अशी सदिच्छा देत, कणकवली तहसीलदार दिशांत देशपांडे यांनी कणकवली तालुका दुचाकी असोसिएशनचे मॅकॅनीक संघटणेच्या कार्यक्रमांत कौतुक केले.
दुचाकी मॅकॅनिक असोसिएशन कणकवली व लोकमान्य मल्टिपर्पज को. आॅप सोसायटी लि. कणकवली यांच्या विद्यमाने कणकवली येथे प्रत्येक टू व्हीलर मॅकॅनिकला स्पेशल टूल्स (दुचाकी दुरुस्तीचे पानासंच) वाटप कणकवली तहसिलदार दिशांत देशपांडे व पोलिस निरीक्षक अमित यादव यांचे हस्ते भेट देण्यात आले. यावेळी तहसिलदार देशपांडे बोलतांना पुढे म्हणाले, समाजसेवेची जाण ठेऊन नि:स्वार्थ भावनेने कार्य करत सर्व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे कणकवलीचे मॅकॅनिक खरे समाजसेवक आहेत.
यावेळी कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव म्हणाले स्वतःबरोबर दुसऱ्या कारागिराचा किंवा सहकार्यांचा व्यवसाय वाढावा याच उद्देशाने संघटीत असलेल्या या कणकवली मेकॅनिक व्यवसाय करणाऱ्या असोसिएशन खरंच कौतुक आहे. आधुनिक गाड्यांचे ज्ञान घेऊन, त्याच्यातही आपली प्रगती करावी असा सल्लाही श्री यादव यांनी देत असोसिएशनच्या उपक्रमाबद्दल गोड कौतुक केले. लोकमान्य सोसायटीचे व्यवस्थापक बाळासाहेब पांडव यांनी या स्तुत्य उपक्रम करणाऱ्या संघटनेला, माझ्या लोकमान्य सहकारी सोसायटी मधून जी सेवा लागेल ती देण्यास आम्ही तयार असल्याचे सांगत, विविध प्रकारचे ठेवींचा लाभ या असोसिएशनने घ्यावा. असे सांगितले.
मॅकॅनिक असोसिएशनचे संचालक नितीन तावडे म्हणाले, माणसांवर वेळ कधी आणि कशी येईल हे सांगता येत नाही. यासाठी आमच्या असोसिएशन तर्फे प्रत्येक मेकॅनिकचा १० (दहा) लाखा पर्यंतचा भारतीय डाकघरा तर्फे विमा उतरवला आहे. शिवाय प्रत्येकाचा मेडिक्लेम सुद्धा केलेला आहे. त्याचप्रमाणे ॲडव्हान्स गाड्यांच्या दुरुस्ती प्रशिक्षणा साठी प्रत्येक महिन्याला आम्ही आमच्या मेकॅनिकना प्रशिक्षण ठेवलेले आहे. आणि याचा प्रत्येकजण फायदा घेत आहे.
त्यानंतर जेष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, शिरगांव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वळंजु सर, लोकमान्य सोसायटी संस्थेचे मॅनेजर दळवी, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी गुरुकृपा अॅटोमोबाईलचे मालक संजु शिरसाट, साईकृपाचे गणपत गुरव, असोसिएशन चे अध्यक्ष – सलीम शेख, उपाध्यक्ष प्रशांत बाणे,
सचिव महेश चिंदरकर, खजिनदार पांडुरंग गावडे, संचालक नितिन तावडे,
प्रमुख सल्लागार विलास बाईत, दशरथ चव्हाण, संदीप पारकर, प्रथमेश परब आदी उपस्थित होते.