*कोकण Express*
*३९वा युवा वर्धापन दिन कोकण टीम मार्फत धडाक्यात साजरा*
३९व्या युवा वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन अनुभव शिक्षा केंद्र यांच्या मार्फत गोपुरी आश्रम व साद टीम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ह्या जिल्हास्तरीय वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा तसेच सोलो डान्स स्पर्धा गोपुरी येथे घेण्यात आल्या. यावेळी सर्व स्पर्धांत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. 3 सप्टेंबरला संपन्न झालेल्या सोलो डान्स स्पर्धा तसेच परितोषिक वितरण सोहळा गोपुरी आश्रम येथे ३९वा युवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले अंगभूत कलागुण सोलो डान्स स्पर्धेच्या माध्यमातून सादर केले. या सर्व जिल्हास्तरीय स्पर्धांत मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होत विविध कलागुण यावेळी सादर केले.
याच दिवशी चारही स्पर्धांचे निकाल व पारितोषिक वितरण तसेच या स्पर्धांसाठी जे परीक्षक म्हणून लाभले तसेच या 39 व्या वर्धापन दिनी जे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यांचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी सावंत प्रथम, पुनम नाईक द्वितीय, सूरज जाधव तृतीय, चित्रकला स्पर्धेत किमया हिंदळेकर प्रथम, भूषण कुमार माळी द्वितीय, तारा गोलतकर तृतीय, काव्य स्पर्धेत ज्योत्स्ना कुबल प्रथम, पार्थ सावंत द्वितीय, भावना परब तृतीय,
सोलो डान्स स्पर्धेत पूर्वा मेस्त्री प्रथम, सृष्टी पवार द्वितीय, विवेक सावंत तृतीय यांनी यश संपादन केले.
यावेळी या कार्यक्रमाला गोपुरी आश्रम संचालक प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, अनुभव शिक्षा केंद्र जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, साद टीमचे अध्यक्ष श्रेयश शिंदे, सदस्य प्रियांका मेस्त्री, अनुभव साथी राहुल कांबळे, श्रुती पाटणकर, मालिनी लाड, स्नेहल तामणकर, परीक्षक समीर राणे, अतुल जाधव, अभाअनिसचे जिल्हा सचिव विजय चौकेकर, दिशा क्लासेसच्या शैला लिंगायत, गुरुकुल अकॅडमीच्या शिक्षिका तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या रुपाली कदम तसेच जिल्ह्यातील स्पर्धक व त्यांचे पालक कार्यक्रमाला उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाण पत्र तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल गुरव यांनी केले. हा सोहळा जोश पूर्ण व आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचनेकर, सरिता पवार, जयराम जाधव, बाळू मेस्त्री, सदाशिव राणे यांचे लाभले.