*कोकण Express*
*माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून 8 सप्टेंबर रोजी सर्वात मोठी दहीहंडी उत्सव कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर दिमाखात रंगणार*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
*माजी खासदार निलेश राणे* यांच्या संकल्पनेतून येत्या *शुक्रवार दि.८ सप्टेंबर २०२३* रोजी कोकणातील *सर्वात मोठा दहीहंडी उत्सव* कुडाळ एसटी डेपोच्या मैदानावर मोठ्या दिमाखात रंगणार आहे. या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यातील पथके दाखल होणार. या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण म्हणून *सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, मानसी नाईक, विनोदी अभिनेता भाऊ कदम, अभिनेता देवदत्त नागे, बॉलीवूड अभिनेत्री रीवा अरोरा* त्याचप्रमाणे बॉलीवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक सचिन गुप्ता आणि सहकलाकार यांचा *लाईव्ह संगीत शो* सुद्धा हा उत्सव रंगणार असून यामध्ये *लेझर शो मुख्य आकर्षण* ठरणार आहे