कलमठ गावातील वीज समस्या गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावा

कलमठ गावातील वीज समस्या गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावा

*कोकण Express*

*कलमठ गावातील वीज समस्या गणेशोत्सवापूर्वी मार्गी लावा..*

*उबाठा युवा सेनेच्या वतीने विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*

*कार्यकारी अभियंता श्री. मोहिते यांच्याकडून वीज समस्या सोडवण्याची ग्वाही…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेले कित्येक दिवस कलमठ गावातील वीज समस्या बाबत वारवार अर्ज करून देखील बीज समस्या सोडवली जात नाही. कलमठ बिडयेवाडी ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवा. यामुळे कलमठ गावात वारंवार वीज खंडीत होवून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीज समस्या मार्गी लागावी यासाठी आज उबाठा युवा सेनेच्या वतीने विद्युत्त वितरणच्या कार्यालयाला धडक दिली. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना याबाबतचे निवेदन देत लक्ष वेधले.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, गणपती आणि गोपाळकाला आणि त्या नंतर सुरू होणारे सण यांच्या अनुषंगाने विजेचे होणारा नेहमीचा खेळ खंडोबा थांबवण्यात यावा यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. जेणेकरून वारंवार विजेवीणा होणारी नागरिकांची गैरसोय टळावी. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खास विनायक राऊत यांचा शिफारशीनुसार मंजुर झालेल्या ट्रान्सफॉर्मर लवकरच कलमठ बिडयेवाडी मध्ये चालू करावा. कार्यकारी अभियंता मोहिते यांनी गणेशोत्सवपूर्वी आपल्या या समस्या मार्गी लावल्या जातील तसेच ट्रान्सफॉर्मर चे काम निखिल लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कलमठ विभाग प्रमुख अनुप वारंग, कलमठ युवासेना शहरप्रमुख धिरज मेस्त्री ग्रा. प. सदस्य सचिन खोचरे, कणकवली तालुका संघटक नितेश भोगले, माजी सरपंच निसार शेख, विलास गुडेकर आदी सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!