*कोकण Express*
*सावंतवाडी तालुक्यात अकरापैकी सात ग्रामपंचायती भाजपकडे तर तीन शिवसेनेचे एकीकडे समसमान बलाबल…*
*शिवसेनेला ३ ठिकाणी यश; इन्सुलीत अपक्ष उमेदवाराची भूमिका निर्णायक..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत ७ ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले आहे.तर तीन ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आली आहे.दरम्यान इन्सुली ग्रामपंचायतीवर शिवसेना व भाजपाचे समसमान उमेदवार निवडून आले आहेत.तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.त्यामुळे अपक्ष उमेदवाराच्या निर्णयावर त्या ग्रामपंचायतीचे भवितव्य ठरणार आहे.
या निवडणुकीत भाजपाने कोलगाव,दांडेली,आंबोली,चौकुळ,मळगाव,मळेवाड या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे.डिंगणेत गाव विकास पॅनल विजय झाले आहे.तर इन्सुली ग्रामपंचायतीवर भाजपा व शिवसेनेचे समसमान उमेदवार निवडून आले आहेत.दरम्यान याठिकाणी अपक्ष निवडून आलेल्या उमेदवाराच्या निर्णयावर ती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात जाईल हे स्पष्ट होणार आहे.