*कोकण Express*
*नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट*
*राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*
*ओरस : प्रतिनिधी*
नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सदिच्छा भेट घेतली. अनंत पिळणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांच्यासोबत प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीरा आचरेकर, कणकवली युवक तालुका अध्यक्ष नयन गावडे, कणकवली विधानसभा मतदारसंघाध्यक्ष युवक देवेंद्र पिळणकर उपस्थित होते.