*कोकण Express*
*सावंतवाडी बस स्थानकाचा परिसर अखेर “चिखलमुक्त”
*सर्वपक्षीयांच्या मागणीला यश; उर्वरित काम पावसाळ्यानंतर करणार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील बस स्थानकाचा परिसर अखेर चिखलमुक्त झाला आहे. त्या ठीकाणी असलेले खड्डे पेव्हर ब्लॉक घालून बुजविण्यात आले आहेत. चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हे काम युद्धपातळीवर करण्यात आले
बसस्थानकातील खड्डे बुजवण्यात यावे यासाठी सर्वपक्षियाकडून आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर साडेपाच लाख रुपयांचा खर्च करून हे काम करण्यात आले आहे याबाबतची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान उर्वरित काम लवकरच करण्यात येणार आहे परिसरात खडीकरण करण्यात येणार आहे परंतु ते काम पावसानंतर करण्याचा मानस आहे त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर हे काम पूर्ण करण्यात येईल असे एसटीचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले तूर्तास ज्या ठिकाणी मोठे खड्डे होते त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहे त्यामुळे आता त्याचा फायदा प्रवाशांना होणार आह