*कोकण Express*
*तळेरे येथे उमेद फाउंडेशनचा शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
उमेद फाउंडेशन तर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.आतापर्यंत २३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृती प्रदान करण्यात आली आहे. यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८३ गरजू विद्यार्थ्यांना निश्चल इस्रानी फाउंडेशन व उमेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. हा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा वामनराव महाडिक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सागर पेंडूरकर यांनी उमेदचे विविध उपक्रम व उमेद शिष्यवृत्तीविषयी सविस्तर माहिती सांगितली. यावेळी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडपत्रासह रेड क्रॉस इंडियातर्फे देण्यात आलेली स्वच्छता कीट प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, दळवी महाविद्यालयाचे सहप्राध्यापक हेमंत महाडिक, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उदय दुदवडकर, माजी प्राथमिक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते सुहास पाताडे, तळेरे येथील तंबाखू प्रतिबंध अभियानच्या प्रमुख श्रावणी मदभावे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, राजापूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या तळरे शाखेचे व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे इत्यादी मान्यवरांनी उमेद फाउंडेशन ही एक साधनेतून पूर्ततेकडे मार्गक्रमण करणाऱ्या होतकरू आणि गरजू ध्येयवाद्यांना अपेक्षांच्या पूर्ततेच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी मनोरा रचून आधार देणारी, उत्तुंग कार्यप्रणाली साधणारी आणि मायेची पखरण करणारी विश्वसनीय संस्था असल्याचे गौरवोद्गार काढून संस्थेला शुभेच्छा दिल्या. उमेद फाउंडेशनच्या गौरवार्थ श्रावणी मदभावे यांनी उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांना नारळाच्या करवंटीपासून स्वतः तयार केलेली ऋणानुबंधाच्या धाग्याची राखी बांधली.वामनराव महाडिक संस्थेतर्फे प्रकाश गाताडे व जाकीर शेख यांचा शाल व श्रीफळ देऊन
सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रहारचे पत्रकार व छायाचित्रकार गुरुप्रसाद सावंत. तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे सचिव संजय खानविलकर, श्रावणी कॉम्प्युटर्सचे मार्गदर्शक सतीष मदभावे, तळेरेचे माजी सरपंच प्रवीण वरुणकर, ओझरम उपसरपंच प्रशांत राणे,दारुम सरपंच तेजस्वी लिंगायत, निलेश सोरप,अक्षय मेस्त्री, प्रा. आशा कानकेकर
तातोबा डांगे,सतेज पाटील,अभय पाटील, जे.बी.पाटील,जे.डी.पाटील ,आर.आर.पाटील, पचकर सर,मेघा नाळे,शोभा पाटील इत्यादी उपस्थित होते.जाकीर शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रदीप नाळे यांनी आभार मानले.