*कोकण Express*
*रोटरी क्लब कणकवलीचा नेशन बिल्डर ॷॅवार्ड मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनासन्मानपूर्वक प्रदान*
* रोटरी इंटरनॅशनल बहुउद्देशीय कार्यक्रमांतर्गत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ५सप्टेंबर या जन्मदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या वतीने शिक्षण क्षेत्रात आपल्या उद्यमशील, परिवर्तनशील, प्रयोगशील विचारांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या गुरुजनांना नेशन बिल्डर ॷॅवार्ड देऊन गौरवण्यात येते. त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री. वामन रामचंद्र तर्फे यांना रोटरीचे माजी अध्यक्ष तथा ज्ञानदा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते सन23-24चा नेशन बिल्डर ॷॅवार्ड सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब कणकवली अध्यक्ष श्री. शंकर (रवी) परब व इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्री. वामन तर्फे हे शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्याच बरोबर संघटनात्मक कार्य करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. सरांनी शेठ तापीदास आणि तुलसीदास व्रजदास चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. कोरोना काळात विविध मार्गाने रुग्णसेवा करताना जांभवडे पंचक्रोशीतील समस्त नागरिकांच्या आर्थिक सहाय्यातून आपल्या कै. सिताराम सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट, जांभवडेच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. आपल्याला शैक्षणिक आणि सामाजिक, संघटनात्मक कार्य करताना कुटुंब, सहकारी, मित्र परिवार, त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे नेहमीच सहकार्य आणि प्रोत्साहन मिळते असे श्री वामन तर्फे यांनी सांगितले*