*कोकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये स्वामी विज्ञानानंद प्रेरित मनशक्ती प्रयोग व संशोधन उपक्रम उत्साहात साजरा*
*स्वामी विज्ञानानंतर प्रेरित मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा संस्थेच्या वतीने संशोधन उपक्रम वार सोमवार दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आयोजित करण्यात आला.*
*सदर उपक्रमाचे उद्घाटन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते*
*या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून माननीय श्री. विवेक सावंत (कणकवली केंद्र व्यवस्थापक, खारघर मनशक्ती केंद्र कार्यक्षेत्र) माननीय श्री. डी. एल. शिंदे सर (वाई, जिल्हा सातारा,निवृत्त शिक्षक,३५ वर्ष मनशक्ती केंद्र अंतर्गत अभ्यासक्रम) माननीय श्री.सतीश बापार्डेकर (ठाणे, उद्योजक मुंबई,मनशक्ती केंद्रासाठी दर महिन्यातील पंधरा दिवस योगदान) यांचे मार्गदर्शन लाभले*
*सदर उपक्रम हा मुलांची मनशक्ती, बौद्धिक कौशल्य, विचारशक्ती वाढवण्यासाठी तसेच पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरला यामध्ये इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ” यौवनातील महत्वाकांक्षा”, इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी “अभ्यास यशाच्या क्लुप्त्या ” तसेच पालक व शिक्षकांसाठी “ताण व्यवस्थापन ” या विषयावर माहिती व मार्गदर्शन केले.*
*या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार श्री. पी.एन.मसुरकर सर (सहा. शिक्षक माध्यमिक) यांनी केले.*