*कोकण Express*
*जालन्यातील मराठा आंदोलकांवरील हल्ल्याचा कणकवलीत निषेध मोर्चा…!*
*छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यास हार घालून मोर्चाला केली सुरुवात…!*
*शेकडो मराठा बांधव मोर्चात झाले सहभागी ; घोषणाबाजींनी परिसर सोडला दणाणून…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जालना येथे मराठी क्रांतीमोर्चाच्यावतीने सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्ह छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत कणकवली तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी मोर्चा काढून या घटनेचा जाहीरपणे निधेष करत आपला आक्रोशही व्यक्त केला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजीचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या लाठीचार सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… एक मराठा लाख मराठा… जय भवानी जय शिवाजी… तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय… आधी घोषणांनी परिसर दनानून सोडला.
या मोर्चात आम.वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,युवा नेते संदेश पारकर,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,युवा सेना प्रमुख सुशांत नाईक, युती सेना प्रमुख रुची राऊत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, जान्हवी सावंत, कुडाळ चे माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट,बाळा गावडे, डॉ.प्रथमेश सावंत,तालुका प्रमुख वैद्यही गुडेकर, वागदे ग्रा. प.सदस्य दुर्वा शिंदे,माधवी दळवी,शहरप्रमुख प्रमोद मसुरक,आबु पटेल, संजना कोलते,राजू रावराणे, नितेश भोगले, रामू विखाले,योगेश सावंत,राजू शेट्ये,राजू राठोड,मंगेश सावंत,निसार शेख,रुपेश आमडोस्कर, प्रा.मंदार सावंत,सचिन आमडोस्कर,नितीन सरंगले,अनुप वारंग,संकेत नाईक,सचिन आचरेकर,बाबू जाधव,ललित घाडीगावकर, सिद्धेश राणे, वैभव मालंडकर, बेनी डिसोजा,शीतल सावंत, सिद्धी राणे,बाबा सावंत,सोमा घाडिगावकर ,सचिन राणे,हर्षद गावडे,आदी सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी चौकातून मुंबई गोवा हायवे मार्गे पटवर्धन चौक ते पुन्हा छत्रपती शिवाजी चौक मार्गे प्रांताधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. मोर्चा जाण्याच्या मार्गावर कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी पदभार कणकवलीच्या संध्या गावडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जावई एका मार्गानेच वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. तर मोर्चात सहभागी मान्यवारांनी सदर घटने बद्दल मनोगत व्यक्त केले तसेच त्यानंतर घटनेच्या