मालवणात उबाठा सेनेला भाजपचा मोठा धक्का

मालवणात उबाठा सेनेला भाजपचा मोठा धक्का

*कोकण Express*

*मालवणात उबाठा सेनेला भाजपचा मोठा धक्का*

छोटू ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली माजी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांसह सुमारे ५०० ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश…

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवणात येथील उबाठा सेनेला भाजपने मोठा धक्का दिला आहे. छोटू ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, तसेच 5 ग्रामपंचायत सदस्यांसह सुमारे ५०० ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा नेते निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मसुरे डांगमोडे गावात हा प्रवेश झाला. गेल्या नऊ वर्षात विकासाचे एकही काम आमदार वैभव नाईकांकडून मार्गी न लागल्याने भाजपात प्रवेश करत असल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.

नशिबात असेल तर मी आमदार होईल पण 2014 पासून दिशाहीन बनलेला कुडाळ मालवणला दिशा देण्याचा माझा प्रयत्न मी नक्की करणार आहे असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले. दत्ता सामंत म्हणाले की, निलेश राणे आणि मी एकत्रच आहोत आमच्या बाबत जेवढ्या अफवा पसरवाल तेवढे पेटून उठून तुमची लंका जाळल्याशिवाय स्वस्त बसणार नाही दत्ता सामंत यांचा विरोधकांना इशारा करणारा माणूस म्हणून छोटू ठाकूर यांची ओळख मसुरे डांगमोडे येथे शेकडो कार्यकर्त्यांसह माजी उपसभापती छोटू ठाकूर यांचा भाजप मध्ये प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!