*कोकण Express*
*कणकवलीतील आजच्या मराठा समाजाच्या मोर्चाला पोलिसांकडून कायदेशीर परवानगी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जालना येथे मराठा आरक्षण करता उपोषण करणाऱ्या मराठा समाज बांधवावर पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत आज सोमवारी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला अखेर कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सार्थ परवानगी दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना देखील मोर्चाला परवानगी दिल्याने आजचा मराठा समाजाचा मोर्चा मोठ्या संख्येने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी देत असतानाच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासह अन्य अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत.