*कोकण Express*
*सौ. उज्वला सावंत यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भिरवंडे-हनुमंतवाडी नं.1 मधील रहिवाशी सौ. उज्वला सूर्यकांत सावंत (77) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , तीन मुलगे, सूना, नातवंडे,पुतणे, पुतण्या असा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सूर्यकांत सावंत यांच्या त्या पत्नी तर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्था चेअरमन राजन सावंत यांच्या त्या आई, वरवडे अंगणवाडी सेविका स्मिता सावंत यांच्या त्या सासू आणि पत्रकार अजित सावंत यांच्या त्या काकी होत.