जालना लाठीहल्ला प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; इशदि शेख..

जालना लाठीहल्ला प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; इशदि शेख..

*कोकण Express*

*जालना लाठीहल्ला प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; इशदि शेख..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलासह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने जाहीर निषेध करुन गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इशदि शेख यानी केली आहे.

सत्ता आमच्याकडे द्या, मी मराठा आरक्षण ताबडतोब देतो, असे सांगणारे देवेंद्र फडणवीस सत्तेत येऊन दिड वर्ष झाले तरी मराठा आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण शांततापूर्ण चाललेल आंदोलन दडपण्याचे काम या सरकारने केले. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. असे शेख म्हणाले.

केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे, असे इर्शाद शेख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!