*कोकण Express*
*राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अभियान सिंधुदुर्गात संपन्न*
*”कोकणातील गुरव समाजाला संघटित करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार…” बाळासाहेब शिरसागर*
*खारेपाटण : प्रतिनिधी*
राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विजयराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व संकलपनेतून कोकणातील विशेष करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्यापाड्यात शासनाच्या विविध योजना पासून आजही उपेक्षित असलेल्या गुरव समाजाला राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करणार.” असल्याचे भावपूर्ण उदगार अखिल भारतीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिरसागर यांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगाव येथे सिताई फार्म हाऊस अँड रिसॉर्ट येथे गुरव समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभियानात बोलताना काढले.