*कोकण Express*
*तळेरे हायस्कूलमध्ये “कापडी पिशवी घरोघरी,पर्यावरणाचे रक्षण करी” अभियान*
*५०० कापडी पिशव्या तयार करून तळेरे परिसरात वाटप*
*तळेरे हायस्कूलच्या स्काऊट गाईड विभागाचा उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
वामनराव महाडिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे मध्ये स्काऊट गाईड विभागामार्फत व कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थी, पालक व वर्गशिक्षक यांच्या सहाय्याने कापडी पिशव्या तयार करून परिसरात वाटप करण्यात आल्या.
यावेळी पंचायत समिती कणकवलीच्या सर्व शिक्षा अभियानाचे सचिन तांबे,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शाळा समिती सदस्य संतोष तळेकर,पत्रकार उदय दुधवडकर,उद्धव महाडिक, गोपाळ चव्हाण,डी.सी.तळेकर , स्काऊट मास्टर पी. एन. काणेकर,एन.बी.तडवी,ए.बी.तांबे,एन.जी.तर्फे,विद्यार्थी,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
“Beat plastic pollution 2023″या जागतिक थीमनुसार वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयातर्फे ‘कापडी पिशवी घरोघरी’ अभियान राबविण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जवळपास ५०० पिशव्या तळेरे बाजारपेठ परिसरात वाटण्यात आल्या. त्याबरोबर कापडी पिशवी वापराबाबत जनजागृती फलक, घोषणा यांनी संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला. तळेरे परिसरातील ग्रामस्थ,व्यापारी,फळविक्रेते,भाजीविक्रेते, मेडिकल,बेकरी वगैरे तसेच सर्वसामान्यांपासून ते थोरा मोठ्यापर्यंत स्काऊट गाईड मार्फत कापडी पिशवी देऊन ती वापराबाबतचा संदेश देण्यात आला.
सचिन तांबे म्हणाले तळेरे हायस्कूलचा हा उपक्रम म्हणजे समाजाला महत्त्वपूर्ण संदेश देणारा आहे.प्लास्टिकचे दुष्परिणाम ओळखून आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःहून प्लास्टिक पिशव्या हटावचा निश्चय केला पाहिजे.
स्काऊट गाईडच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे परिसरातील नागरिक स्वागत करतीलच व दिलेल्या संदेशाचे त्यांच्याकडून नक्कीच पालन होईल अशी अपेक्षा प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी व्यक्त केली.
स्काऊट मास्टर पी.एन. काणेकर यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून कापडी पिशवी वापराबाबत महत्व विशद केले. यावेळी पत्रकार उदय दुधवडकर, विद्यार्थिनी प्रांजल साटम,मृण्मयी तळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमाचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर,शाळा समिती चेअरमन अरविंद महाडिक,सर्व समिती सदस्य,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. आभार गाईड प्रमुख डी.सी. तळेकर यांनी मानले.