*कोकण Express*
*तळेरे गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी मारुती वळंजू यांची वर्णी*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी तळेरे वाघाचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती वळंजू यांची निवड ग्रामसभेत सर्वांनुमते करण्यात आली.
तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली तळेरे ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाली.या सभेत मारुती वळंजू यांची तळेरे गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
उपसरपंच शैलेश सुर्वे,ग्रा.प. सदस्य तसेच ग्रामसेविका सौ.जाधव तसेच माजी सरपंच चंद्रकांत तळेकर,प्रविण वरुणकर,शशांक तळेकर,माजी अध्यक्ष मनोज तळेकर,मोहन भोगले व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांचे सरपंच हनुमंत तळेकर व इतर सर्वांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
मारुती वळंजू यांचा सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.तसेच ते सर्प मित्र म्हणून सर्वत्र परिचित आहेत.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.