*कोकण Express*
*चांद्रयान मोहिमेत सुहास शिरोडकर यांची नेत्रदीपक कामगिरी*
*अवकाशातील चांद्रयान मोहिमेत सिंधुदुर्ग पुत्र सुहास शिरोडकर यांची गगनभरारी.*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेल्या यशस्वी चाऺद्रयान मोहिमेमुळे भारताची साऱ्या जगात वाहवा झाली. भारताने आपले चांद्रयान चऺद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले आणि असे करणारा भारत हा पहिला देश ठरला. या यशस्वी मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोरे गावचे सुहास शिरोडकर यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. या त्यांच्या देशसेवेबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
चाऺद्रयान ३ मोहिमेसाठी गेली तीन दशके इस्त्रोशी सऺलग्न असणाऱ्या मुंबईस्थित एका खासगी कऺपनीने जीएसएलव्ही अवकाश यानासाठी लागणारे विकास इंजिन, सीई 20 इंजिन तसेच विक्रम लॅऺडरमधील थ्रस्टर्स अशा महत्त्वपूर्ण घटकांची गुणवत्तापूर्वक निर्मिती आपल्या कारखान्यात करून पुरवठा केलेला आहे.
सिंधुदुर्गवासीय लोरेस्थित सुहास शिरोडकर, सध्या या नामाऺकीत कंपनीत इँजिनीअर म्हणून गेली दोन दशके कार्यरत असून , एरोस्पेस क्षेत्रातील, भारतीय अवकाश संशोधन संस्था ( ISRO) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), विमान तऺत्रज्ञान यांच्यासाठी असलेल्या उपक्रमात भाग घेऊन देशसेवेसाठी हातभार लावत आहेत.
सुहास शिरोडकर यांनी आपले शालेय शिक्षण विद्या विकास हायस्कूल, चुनाभट्टी तसेच अभियांत्रिकीचे शिक्षण के. जे. सोमय्या आणि व्यवस्थापन शिक्षण वेलिँगकर संस्थेतून घेतले आहे. तसेच आय आय एम रायपूर या संस्थेतून ऑपरेशन्स मँनेजमेन्ट पूर्ण केले आहे. यांत्रिकी विभागातील सीनसी मशीन, प्रोसेस, प्रोजेक्ट व्यवस्थापन, मशीन शॉप, कॅड/कॅम या विषयामध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे.
आत्मनिर्भर भारतीय देशसेवेच्या कर्तव्य भावनेतून केलेल्या यशस्वी सेवेची दखल घेऊन समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवकाश अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याऺचे सर्वत्र अभिनऺदन केले जात आहे.