*कोकण Express*
*फोंडाघाट बाजारपेठ येथे तन्मय आपटे यांचे योगेश्वरी मेडीकल स्टोअर्सचे उद्घाटन उत्साहात संपन्न….*
*अजित नाडकर्णी यांनी तन्मय आपटे यांना दिल्या मनभरून शुभेच्छा*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
तन्मय अविनाश आपटे फोंडाघाट गावाचे रहिवासी असून यांच्या योगेश्वरी मेडीकल स्टोअर्सचे उद्घाटन आज संकष्टीच्या शुभ मुहुर्तावर करण्यात आले. या उद्घाटन समारंभ बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी आणि सर्व नागरीकांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या. स्व. अविनाश आपटे यापुर्वी योगेश्वरी कोकणी मेव्याचे दुकान बरेच वर्ष चालवत होते. त्या दुकानातुनच तन्मयने व्यावसायाचे बाळकडु घेतले.त्यानंतर तन्मयने बी.फार्म डिग्री हासील करुन त्याने आज योगेश्वरी मेडीकल स्टोअर्स सुरु केले. अजित नाडकर्णी यांनी श्री. धनवंतरीची फ्रेम भेट देवुन अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.