सिंधुदुर्ग पुत्र डाॅ.कौस्तुभ बावधनकर (न्युराॅलाॅजिस्ट) यांनी युरोपमधील डाॅक्टरांच्या जागतिक परिषदेत आपला ठसा उमटवला

सिंधुदुर्ग पुत्र डाॅ.कौस्तुभ बावधनकर (न्युराॅलाॅजिस्ट) यांनी युरोपमधील डाॅक्टरांच्या जागतिक परिषदेत आपला ठसा उमटवला

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग पुत्र डाॅ.कौस्तुभ बावधनकर (न्युराॅलाॅजिस्ट) यांनी युरोपमधील डाॅक्टरांच्या जागतिक परिषदेत आपला ठसा उमटवला*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील तळेरे गावचे सुपुत्र डाॅ कौस्तुभ बावधनकर यानी.बुधवार,30 ऑगस्ट 2023 रोजी युरोपमधील डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे भरलेल्या जागतिक ‘पार्किंन्सोनिझम आणि मूव्हमेंट डिसाॅर्डर परिषदेमध्ये (World congress of Parkinson and movement disorder.) भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च बहुमान मिळवला आहे.या परिषदेत डाॅ. कौस्तुभ यांनी जगात अत्यंत दुर्मीळ असणाऱ्या IgLON5 आणि DRPLA या स्वतः संशोधित केलेल्या मेंदूसंबधीत केसेस सादर करून जागतिक न्युराॅलाॅजी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.परिषदेला संपूर्ण जगातून अंदाजे अडीज ते तीन हजार न्यूराॅलाॅजिस्ट उपस्थित होते.परिषदेचे अध्यक्ष डाॅ.ॲन्थनी लँग आणि डाॅ .कैलास भाटिया (लंडन) या जागतिक कीर्तीच्या न्यूराॅलाॅजिस्टनी डाॅ. कौस्तुभ यांचे अभिनंदन केले आहे.डाॅ.कौस्तुभ हे मुंबई च्या.ई.एम.हाॅस्पिटल आणि जी.एस.मेडिकल कॉलेज मध्ये न्युराॅलाॅजीमधील डी.एम.हे सर्वोच्च शिक्षण घेत आहेत. डाॅ .कौस्तुभ बावधनकर हे सिंधुदुर्ग, तळेरे,कणकवली,येथील डाॅ .प्रकाश व डाॅ .अनुपमा बावधनकर यांचे चिरंजीव आहेत.
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तळेरे येथेच पुर्ण झाले. ते लहाणपणा पासूनच हुशार विद्यार्थी म्हणून गणले जायचे.त्यांच्या या यशामुळे तळेरे दशक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पूढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!