*कोकण Express*
*नारळ लढवणे या पांरपारिक स्पर्धेत संकेत महाडिक प्रथम तर प्रथमेश गुरसाळे द्वितीय*
*कासार्डे प्रतिनिधि : संजय भोसले*
नारळी पौर्णिमेनिमित्त कणकवली तालुक्यातील तरळे येथे बाजारपेठ मित्र मंडळाने जिल्हास्तरीय नारळ लढवणे ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संकेत महाडिक तळेरे यांनी पटकाविला.तर द्वितीय क्रमांक प्रथमेश गुरसाळे आणि तृतीय क्रमांक तेजस तळेकर ,चतुर्थ क्रमांक प्रविण तळेकर (सर्व तळेरे) यांनी पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण साई खटावकर,संजय वरुणकर आणि तात्या पिसे यांनी केले.
या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच हनुमंत तळेकर,शरद वायंगणकर, माजी सभापती दिलीप तळेकर, माजी सरपंच प्रविण वरुणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार,उदय पाटील, राजापूर बॅंक मॅनेजर, ग्रामपंचायत सदस्य शर्वरी वायंगणकर, मारुती वळंजू ,सचिन पावसकर, अध्यक्ष स्वप्निल कल्याणकार उपस्थित होते.
या स्पर्धेचे जिल्ह्यातील ७४ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला.या स्पर्धेचे युट्यूब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते त्यासाठी मनिष पिसे कॅमेरामन गोट्या पांचाळ, कॅमेरामन शुभम देसाई यांनी केले.स्फर्धैचे बक्षिस वितरण सर्व उपस्थित मान्यवर मंगेश गुरव, सचिन पिसे,मनोज महाडिक, अरविंद महाडिक,सागर डंबे, राजेंद्र पिसे,रंजन खटावकर, आप्पा कल्याणकर, पप्या कल्याणकर,सुयोग महाडिक आणि मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाजारपेठ मित्र मंडळाच्या सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.