*कोकण Express*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते बांधकाम सभासद नोंदणी व घरेलू महिला कामगार शिबिराचा शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) बोर्डवे शाखेच्या वतीने आयोजीत भव्य बांधकाम सभासद नोंदणी शिबीर आणि घरेलू महिला कामगार सभासद नोंदणी शिबीर या उपक्रमाचा शुभारंभ युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला.
ग्रामीण भागात बांधकाम सभासद नोंदणी शिबीर आणि घरेलू महिला कामगार सभासद नोंदणी कमी प्रमाणात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली बोर्डवे गावात विनामूल्य बांधकाम सभासद नोंदणी आणि घरेलू महिला कामगार सभासद नोंदणी बोर्डवे विनायक ट्रेडर्स येथे राबविण्यात आली. यावेळी १५० पेक्षा जास्त महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोर्डवे ग्रामपंचायत सदस्य महादेव राठवड आणि कळसुली उपविभागीय अध्यक्ष शरद साळवी यांचे बोर्डवे गावात विनामूल्य नोंदणी शिबिर आयोजित केल्याबद्दल महिला वर्गाकडून विशेष समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले, कळसुली उपविभागीय अध्यक्ष शरद साळवी, बोर्डवे शाखाप्रमुख ग्रा. पं. सदस्य महादेव राठवड, ग्रा.पं. सदस्य सौ. शुभदा शिंदे, पांडुरंग कारेकर, नरेश येंडे, स्वप्निल खांदारे, सौ. निलाक्षी सोहनी, युवासेना अध्यक्ष- स्वप्निल शिंदे, प्रकाश शिंदे विनोद परब, साक्षी येंडे विनायक राठोड, वनिता कारेकर ओंकार गुरव, रिमेश चव्हाण यांच्यासह बोर्डवे गांवातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.