*कोकण Express*
*शिवसेना महिला आघाडीच्या खेळ पैठणीचा स्पर्धेत सौ. प्रीती चोपडेकर विजेत्या*
नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे आयोजित ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत सौ. प्रीती प्रदीप चोपडेकर (देवबाग) विजेत्या ठरल्या. तर द्वितीय क्रमांक सौ. हिमानी देवेंद्र गायकवाड (मालवण) व तृतीय क्रमांक सौ. आर्या अभय गावकर (हडी) यांनी पटकवला. तिन्ही विजेत्यांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले.
मालवण येथील शिवसेनेच्या नूतन तालुका कार्यालयात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत १८ महिलांनी सहभाग घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात रंगतदार झालेल्या स्पर्धेस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण साहित्यिका वैशाली पंडित यांनी केले. सूत्रसंचालन शुभम धुरी (वेंगुर्ला) यांनी केले. विजेत्या महिलांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व महिला जिल्हा प्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी पुरस्कृत केलेली पैठणी व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे व इतर महिला कार्यकर्त्यां यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, मालवण कुडाळ क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, शहरप्रमुख, महिला तालुकाप्रमुख स्मृती बांदेकर, उपतालुकाप्रमुख भारती घारकर व निकिता तोडणकर, ग्रामीण शहरप्रमुख गीतांजली लाड, कोळंब विभागप्रमुख आशा उळप्पी, कुडाळ उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, शमिका ताई आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमा नंतर शिवसेना महिला आघाडी तर्फे मालवण पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.