आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवतीचा मुस्लिम बांधवांकडून निषेध

आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवतीचा मुस्लिम बांधवांकडून निषेध

*कोकण Express*

*आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवतीचा मुस्लिम बांधवांकडून निषेध…*

*पोलीस ठाण्यात निवेदन युवतीवर कारवाईची मागणी….*

*कणकवली ः प्रतिनिधी*

येथील एका युवतीने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणेबाबतचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवला. तसेच हिंदू, देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तो मिडीयामध्ये प्रसिध्द केला आहे. त्याचा कणकवली तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने आज निषेध व्यक्त करण्यात आला.

मूळची कणकवली तालुक्यातील नसून बाहेरील राज्यातून आलेल्या एका युवतीने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणेबाबतचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवला. तसेच हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तो मिडीयामध्ये प्रसिध्द केला. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने तिचेवर कारवाई करणेकरीता कणकवली पोलिसांना अर्ज दाखल झाला आहे या अर्जावर सकल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली यावेळी यावेळी तालुका मुस्लिम संघटनेचे आसिफ नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, निसार शेख, अजीम कुडाळकर, हनिप पीरखान, अनिस नाईक यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते..

मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलिसांकडे दिलेल्या नियोजनात त्यांनी म्हटले आहे की आजतगायत कणकवली तालुक्यातील स्थानिक मुस्लिम व स्थानिक इतर धर्मियांबाबात कधीही आपसात मतभेद नाहीत. सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. फक्त कणकवली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वधर्म समभावात चालतो याचे राज्यात आदर्श उदाहरण आहे. अशी परिस्थिती असताना एखादी विशिष्ट व्यक्ती गैरकृत्य करीत असेल तर त्या व्यक्तीबाबत सखोल चौकशी होवून त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!