कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट व गोखले कॉलेज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा संपन्न.

कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट व गोखले कॉलेज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा संपन्न.

*कोकण Express*

*कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट व गोखले कॉलेज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा संपन्न.*

*विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमाच्या सामंजस्य करारातून मिळणाऱ्या मार्गदर्शनतून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान मिळते – प्रा. संजयकुमार मेणशी*

विद्यार्थ्यांना प्रकल्प अहवाल सखोल पद्धतीने समजावा, विविध तज्ञांची मार्गदर्शने जर विद्यार्थ्यांना लाभली तर प्रकल्प अहवाल अतिशय दर्जेदार होत असतो त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
फॅकल्टी व स्टुडन्ट एक्सचेंज या शैक्षणिक सामंजस्य करारा अंतर्गत नुकतेच फोंडाघाट महाविद्यालयामध्ये, क्षेत्र पाहणी अहवाल कसा लिहावा, याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोखले महाविद्यालय कोल्हापूर येथील, भूगोल विभाग प्रमुख प्रा. संजयकुमार मेणशी
यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दोन्हीही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाअंतर्गत क्षेत्र पाहणी कोणत्या ठिकाणी आयोजित करावी, क्षेत्र पाहणी करत असताना निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास, संशोधन कसे करावे, निसर्गामध्ये क्षेत्र पहाणीच्या ठिकाणी असलेल्या प्राकृतिक रचनेनुसार पर्वत, पठारे, मैदाने, वनस्पती, मृदा प्रकार तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या लोककला, संस्कृती यांचा अहवाल लेखनामध्ये कसा वापर करायचा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात डॉ सतीश कामत म्हणाले, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या सामंजस्य करारामधून आयोजित केल्या जाणाऱ्या, विविध शैक्षणिक कार्यक्रमांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या भावी जीवनासाठी करून घ्यावा. पुन्हा पुन्हा संधी येत नसते, त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या संधीचा उपयोग आपल्याला वरदानच ठरत असतात. या कार्यक्रमासाठी फोंडाघाट महाविद्यालयाचे तसेच गोखले कॉलेज कोल्हापूर येथील, भूगोल विषयाचे विद्यार्थी
तसेच डॉ. निलेश सुसवरे, श्री. निलेश ससणे, श्री. सचिन राजपूत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी तर आभार प्रा.विनोदसिंह पाटील यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!