*कोकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी तसेच पर्यवेक्षक श्री बयाजी बुराण यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने प्रशालेत बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे –
१४ वर्षाखालील मुले –
अथर्व सचिन सादये प्रथम, सार्थक सूर्यकांत साटम द्वितीय, ऑस्टीन विनुस डिसोजा व मैत्रेय रामेश्वर सावंत तृतीय, अथर्व गंगाराम तांबे उत्तेजनार्थ
१४ वर्षाखालील मुली
कृपा अनिल पेडणेकर प्रथम, सिद्धी रविकांत पेंडुरकर द्वितीय, सोफिया रूजाय फर्नांडिस व दिशीता मनीष सावंत तृतीय, रेणुका मंगेश परब उत्तेजनार्थ
१७ वर्षाखालील मुले
यश रेश्मा मेस्त्री प्रथम, ओमकार पंढरीनाथ पारकर द्वितीय, आर्यन शरद ठाकूर व सक्षम हेमंत नाडकर्णी तृतीय, दर्शन लक्ष्मण पिळणकर उत्तेजनार्थ
१७ वर्षाखालील मुली प्राजक्ता ज्ञानेश्वर गोडसे प्रथम, गार्गी रामेश्वर सावंत द्वितीय, मैत्रेयी मकरंद आपटे व सृष्टी हरिश्चंद्र वावळे तृतीय, जान्हवी रामदास पांचाळ उत्तेजनार्थ
१९ वर्षाखालील मुले
आर्यन सुनील पाटील प्रथम, तन्मय सचिन दळवी द्वितीय, पंकज महेंद्र चव्हाण तृतीय
१९ वर्षाखालील मुली भाग्यलक्ष्मी रामचंद्र पारकर प्रथम, स्वरदा दत्तात्रय सावंत द्वितीय, रक्षंदा सुनील कांबळे व श्रद्धा सुनील गावडे तृतीय
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई ते विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धेला पंच म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण व संस्कृत अध्यापक श्री. मकरंद आपटे यांनी काम पाहिले.