*कोकण Express “
*लोरे नं.१ ग्रामसभेत वादावादी : ग्रामसेवकांना धमकी, ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल….*
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल; लोरेतील दोन्ही गट रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील लोरे नं.१ ग्रामसभेत दोन गटात वादावादी झाली होती. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बसलेले असताना अमित अरुणराव राणे व अन्य ४ जणानी येत आम्ही दिलेल्या अर्जाची माहिती आताच्या आता द्या, अशी मागणी करत शासकीय काम करत असताना एकत्र जमून केबीन मध्ये बाहेर जाण्यास अटकाव केला, फिर्यादी ग्रामसेवक ऋतुराज महादेव कदम (वय ४२, रा. कणकवली कनकनगर) यांना तुमचे निलंबन करू अशी धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात भादवि कलम ५ 186,141,143,147,149,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी ग्रामसेवक ऋतुराज महादेव कदम (वय ४२, सच्चा रा. कणकवली कनकनगर) हे लोरे नं.१ ग्रामसभेत झालेल्या वादानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना संशयित आरोपी अमित अरुणराव राणे, चंद्रशेखर दशरथ रावराणे, निलेश अशोक राणे, विशाल विश्राम राणे, मच्छिंद्रनाथ पांडुरंगराव राणे (सर्व राहणार लोरे नं १) पानी २९ ऑगस्टला १ वाजता ग्रामसेवक केबिन मध्ये आले.
गावचे रहिवासी अमित अरुण रावराणे यांनी ग्रामपंचायतीला मिळणा-या निधीची माहिती ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये मिळावी, याबाबत २५ ऑगस्टला अर्ज केला होता. त्यांचे विनती प्रमाणे दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास ग्रामसभेमध्ये चर्चा झाली. अमित अरुण रावराणे यांनी मागितलेली माहिती ही मोठ्या स्वरूपाची असल्याने ती लेखी स्वरूपात नंतर कळविण्यात येईल असे गावचे सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी सांगितले.
परंतु अर्जदारांनी अर्जातील माहिती आत्ताच पाहिजे, असे मोठ्या आवाजात सांगत होते. परंतु ग्रामसभेत इतर विषय असल्याने फिर्यादी श्री. कदम
यांनी त्यांचे अर्ज विषयी नंतर लेखी माहिती देऊ असे समजावून सांगून पुढचा विषय चर्चेसाठी घेतला. दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता वरील ५ आरोपी यांनी ग्रामसेवक यांचे केबिन मध्ये येत आरोपी नं. १ पाने श्री. कदम यांना माझ्या अर्जाची आताच्या आता माहिती द्या, नाहीतर परत ग्रामसभा बोलवा, असे बोलून तुमची बी.डी.ओ. कडे तक्रार करतो, पत्रकार बोलवतो, तुम्हाला निलंबित करतो, अशी धमकी दिली. आरोपीत नं. १ ते ५ यांनी ऑफिसमध्ये दंगा घातला व आरोपीत नं. १ याने माझ्या अर्जाची माहिती दिली नाही. तर संध्याकाळ पर्यंत इथेच बसायचे तुम्हाला बाहेर सोडणार नाही असे बोलले आरोपीत १ ते ५ यांनी एकत्र जमून फिर्यादी यांना तुम्ही येथून बाहेर कसे पड़ता ? ते बघतो असे बोलून केबिन मधुन बाहेर पडु देत नव्हते. फिर्यादी शासकीय काम करत असताना एकत्र जमून केबीन मध्ये बाहेर जाण्यास अटकाव करून फिर्यादी यांना धमकी दिली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास श्री शेगडे करीत आहेत.