*कोकण Express*
*कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे*
*जिल्ह्यातील कलाकार मानधन समिती गठीत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या समितीवर राजाराम धुरी, हरिभाऊ भिसे, सौरभ पाटकर, अजिंक्य पताडे, शैलेश जामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.