महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या वर्धापन दिनी गीटार वादनाने रसिक मंत्रमुग्ध

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या वर्धापन दिनी गीटार वादनाने रसिक मंत्रमुग्ध

*कोकण Express*

*महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या वर्धापन दिनी गीटार वादनाने रसिक मंत्रमुग्ध*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित संस्थेचा वर्धापन दिन आणि अमृत महोत्सवाच्या सांगता समारोह निमित्त श्रावणी कंप्युटर तळेरे येथे गिटार वादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रज्ञांगण गिटार प्रशिक्षक सुधांशू तांबे यांच्यासह त्यांचे शिष्य छोटे उस्ताद यांनी देशभक्तीपर गीतांची धून सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाला तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कलांना प्रोत्साहन मिळाले तर त्यातून आत्मविश्वास अजून वाढवा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. गेले एक वर्ष सुरू असलेला हा गिटार क्लास प्रशिक्षक सुधांशू तांबे यांनी उत्तमरित्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी अप्रतिम देशभक्तीपर धून वाजवून उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.

“ग्रामीण भागामध्ये गिटार क्लास सुरू व्हावेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. कारण आपल्या परिसरात कोठेही असे माध्यम नाही. आणि प्रज्ञांगण च्या माध्यमातून ही संधी मिळाली.” असे उद्गार सुधांशू तांबे यांनी प्रतिपादन केले. तसेच प्रज्ञांगणच्या संस्थापिका सौ श्रावणी मदभावे यांचेही आभार मानले.

तसेच सतीश मदभावे यांनी गिटार क्लासेसच्या छोट्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कलेचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. श्रावणी मदभावे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांना सादर होणे खूप गरजेचे आहे. तसेच आपल्याला उत्तम नागरिक व्हायचे असेल तर आपल्याकडे संस्कार, ज्ञान, तंत्रज्ञान या गोष्टी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे उत्तम माणूस व्हा. तुमची जी कला आहे ती चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल” असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर यांनी केले. सतीश मदभावे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या गीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!