मराठा-कुणबी समाजातील तरूणानी स्वंयरोजगार, उद्योजकता इ. कौशल्याने शासकिय योजनांचा लाभ घ्यावा.

मराठा-कुणबी समाजातील तरूणानी स्वंयरोजगार, उद्योजकता इ. कौशल्याने शासकिय योजनांचा लाभ घ्यावा.

*कोकण Express*

*मराठा-कुणबी समाजातील तरूणानी स्वंयरोजगार, उद्योजकता इ. कौशल्याने शासकिय योजनांचा लाभ घ्यावा*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

मराठा, कुणबी समाजासाठी शासनाच्या सारथी विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांपैकी सी.एस.एम.एस डी.ई.ई.पी. डिप्लोमा संदर्भात ग्रामपंचायत ओझरमच्या ग्रामसभेत लाभार्थी कु.दत्तराज प्रमोद राणे यांनी महिती दिली, मराठा-कुणबी समाजाच्या नागरीकांनी रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण घेत क्षमता निर्माण करणे, विद्यार्थी, विद्वान, उद्योजक, शेतकरी आणि महिलांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र स्थापन करणे, संस्थाआणि विविध शिष्यवृत्ती,स्टायपेंड अनुदान राबवणे हा या संस्थेचा उद्देश असून या उपक्रमाची स्थापना महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम.के.सी.एल) सोबत १९५६च्या तरतुदी अंतर्गत करण्यात आली आहे.
या योजनेचा मराठा-कुणबी समाजातील बहुसंख्य तरूणांनी सतर्क राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. वय वर्ष १८ ते ४५ च्या आतील स्त्री-पुरुषांनी किमान 10 वी उत्तीर्ण या पात्रतेसह जवळच्या अधिकृत अध्ययन केंद्राशी संपर्क साधून पुढील कार्यवाही पूर्ण करावी आणि या भविष्यातील आवश्यक संगणक प्रशिक्षणाची पूर्तता करून घ्यावी. या संपूर्ण डिप्लोमा प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी इंग्लिश कम्युनिकेशन स्किल-आणि समाजात-इंडस्ट्रीत वावरत असताना आवश्यक सॉफ्ट स्किल्स चे धडे सर्वप्रथम गिरवणार आहेत, त्यानंतर दुसर्या मोड्यूल मध्ये विद्यार्थी 21 व्या शतकातील सर्वंकष संगणक ज्ञानाची परिपक्वता मिळवून माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या जगासाठी सिद्ध होणार आहेत, ज्यामध्ये डिजिटल फ्रीलान्सिंग, AI टूल्स, CHAT GPT, सायबर सिक्युरिटी, Google Suit, MS Office असे महत्वपूर्ण ज्ञान मिळवणार असून तिसर्या आणि चौथ्या मोड्यूल मध्ये विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणातील तथा करिअर साठी आवश्यक वाटणाऱ्या कौशल्यपूर्ण कोर्सेस चा समावेश करून हा डिप्लोमा (पदविका) अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे.
सारथीच्या या प्रशिक्षणासाठी तळेरे येथील श्रावणी कंप्युटरची निवड अधिकृत केंद्र म्हणून करण्यात आली असून ग्रामपंचायत ओझरम येथे आयोजित ग्रामसभेमध्ये या कोर्सेसच्या लाभार्थ्यांकडून हि माहिती देण्यात आली.

यावेळी ओझरम सरपंच सौ.समृद्धी राणे, उपसरपंच प्रशांत राणे,ग्रामसेवक जी.वाय.बोडेकर,प्रभाकर राणे, आदी उपस्थित होते. ओझरम गावच्या तरुणांसाठी हि विशेष माहिती ग्रामसभेत दिल्याबद्दल ग्रामपंचायत ओझरम कडून श्रावणी कंप्युटर चे संचालक श्री. सतिश मदभावे यांचे विशेष आभार मानण्यात आले. आणि याविषयी अधिक तर माहितीसाठी सारथीच्या तळेरे येथील अधिकृत केंद्र श्रावणी कंप्युटर याच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!