मालवण शहरात येऊ घातलेल्या टीव्ही सायकल विक्री संदर्भात स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यापारी संघटनेला निवेदन

मालवण शहरात येऊ घातलेल्या टीव्ही सायकल विक्री संदर्भात स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यापारी संघटनेला निवेदन

*कोकण Express*

*मालवण शहरात येऊ घातलेल्या टीव्ही सायकल विक्री संदर्भात स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यापारी संघटनेला निवेदन*

*मालवण ः प्रतिनिधी*

आम्ही मालवण शहरातील तालुका व्यापारी संघटनेतील टीव्ही व सायकल व्यापारी आहोत, मागील कित्येक वर्षापासून आम्ही ब्रॅण्डेड सायकल व टीव्ही विक्री करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे, पण या काही महिन्यात पाऊस म्हणा किंवा अन्य काही कारणाने आमचा व्यवसाय अतिशय कमी झालेला आहे, पुढे गणेश चतुर्थी चा सण येत आहे, आणि अशाच वेळेस 25 ऑगस्ट रोजी एका राजकीय पक्षाने 50% सवलतीच्या दरात सायकल विक्री किंवा टीव्ही विक्री अशा गोंडस नावाखाली स्थानिक कंपनीचे टीव्ही किंवा सायकल विक्री करत आहेत, टीव्ही किंवा सायकल विक्री करणे याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही पण जे टीव्ही किंवा सायकल विक्री करत आहेत ते नॉन ब्रांडेड असून फक्त नाम साधर्म्य असलेले टॉप ब्रँड पन्नास टक्के सूट म्हणून विक्री करत आहेत अशी माहिती मिळाली आहे, आणि यामुळेच आम्ही विक्री करत असलेले ओरिजनल ब्रँड याच्या विक्रीवर प्रचंड परिणाम झाला आहे, यासंदर्भात व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याची संपूर्ण चौकशी करून, टीव्ही किंवा सायकल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची जीएसटी डिटेल्स त्याचे बिल तो विक्री करत असलेला ब्रँड याची संपूर्ण माहिती घ्यावी व बनावट असल्यास त्यांना योग्य समज देऊन त्यावर योग्य निर्णय घ्यावा, जर असे झाले नाही तर कदाचित पुढे आम्हाला आमचा चरितार्थ चालवणे देखील मुश्किल होऊन जाईल, आज टिव्ही ,सायकल साठी 50% ऑफर आणली आहे ,पुढे काही दिवसात भांडी,मोबाईल,चप्पल,कपडे अशा विविध व्यवसायात देखील अशा पद्धतीचे सेल येण्यास कमी करणार नाहीत,अशा वेळेस स्थानिक व्यापाऱ्यांनी उभे केलेले व्यवसाय त्यांनी काय करावे?दुकानाचा सेटअप,भाडे, ,कामगार भाडे, जीएसटी, विज बिल, म्युन्सिपल टॅक्स हे सर्व त्यातूनच निघत असते, आणि असेच जर दुय्यम प्रॉडक्ट आणून बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनी स्थानिक मार्केटमध्ये स्थानिक व्यावसायिकांना स्पर्धा तयार केली तर स्थानिक व्यावसायिक आपला व्यवसाय कसा चालविणार, त्यांनी अधिकृत लायसन्स, किंवा भारतीय व्यापार संहितेप्रमाणे व्यवसाय करण्यास कुणाची काही हरकत नाही, सरकारी टॅक्स, ओरिजनल प्रॉडक्ट, ओरिजिनल बिले ही देऊन व्यवसाय करावा.

तेव्हा पुन्हा एकदा कळकळीची विनंती, यावर संघटनेने लवकरात लवकर निर्णय घेऊन यावर तोडगा काढावा.

आपले नम्र
वेलकम इलेक्ट्रॉनिक्स,मालवण
अनिल ऑटो मोबाईल ,मालवण
सुजाता टाईम सेंटर,मालवण
ज्युली सायकल स्टोअर, मालवण
परब इलेक्ट्रॉनिक्स, मालवण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!