*कोकण Express*
*श्रावणी सोमवार निमित्त कुणकेश्वर देव दर्शन यात्रा*
*पटकीदेवी मित्रमंडळ व समृद्धी फाउंडेशनच्या वतीने यात्रेचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पटकीदेवी मित्रमंडळ व समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर देवदर्शन यात्रा काढून शहरातील महिलांना श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घडवून आणले. याचा ६५ महिलांनी लाभ घेतला. समृद्धी फाउंडेशनचे संस्थापक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व बाळू पारकर यांच्या सौजन्याने ही यात्रा काढण्यात आली.
या यात्रेचा शुभारंभ माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी गीता माणगावकर, विधी पारकर दिपाली धुमाळे, श्रीमती पाटकर, श्रीमती निमणकर, रेणुका काणेकर, नूतन कडुलकर, दीक्षा बेंडखळे व पटकीदेवी मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.