खारेपाटण येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

*कोकण Express*

*खारेपाटण येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*

​*खारेपाटण ः प्रतिनिधी*

​स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव गं.पेंढारक सर यांच्या ​९७ व्या जयंती निमित्त खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य  आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण च्या वतीने दि.​२२ जानेवारी ​२०२१ रोजी सकाळी – १०.०० वाजता भव्य राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन खारेपाटण महाविद्यालयात करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन खारेपाटण महाविदयलायचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे यांनी केले आहे.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य शंकरराव पेंढारकर सर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी महाविदयलायत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेचे यंदाचे हे ७ वे वर्षे आहे. या स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत.
१)जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची सद्यस्थिती.२)सरकारचा कल खाजगीकरणाकडे.३)केंद्र सरकारचे कृषी धोरण शेतकऱ्यास पूरक की मारक ? ४)NEP 20 – ​२० शैक्षणिक परिवर्तन घडवेल का ? ५)भारतीय न्यायव्यवसथा विश्वासार्ह कि अविश्वासार्ह ? ६)लॉक डाऊन चा पर्यावरील परिणाम. ७) COVID -​१९ लस संशोधन …. वैज्ञानिक यश कि अपयश…. ८)प्रसार माध्यमांची वास्तवता ?
तर या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक – ५०००/- द्वितीय पारितोषिक – ४०००/- तृतीय पारितोषिक – ३०००/- व उत्तेजनार्थ पारितोषिक – २०००/- ठेवण्यात आली असून स्पर्धेकरिता खालील नियम अटी ठेवण्यात आल्या आहेत.
सदर स्पर्धा वरिष्ठ महाविद्यलयीन विद्यार्थ्यांना करिता असुन महाराष्ट्र राज्य मर्यादित आहे.एका महाविद्यालयातील किमान एक व कमाल दोन विद्यार्थीच स्पर्धेत भाग घेऊ शकतील.​ ​स्पर्धा केवळ मराठी माध्यमातून घेण्यात येणार असून स्पर्धकाला विषय सादरीकरणासाठी ८ मिनिटे + ​२ मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धकाजवळ महाविद्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.​ ​विजेत्या स्पर्धकांच्या भाषणांना  महाविद्यलयाच्या वार्षिक अंकात प्रसिद्धी दिली जाईल. तरी स्पर्धकांनी आपल्या भाषणाची लेखी प्रत स्पर्धा आयोजन समितीकडे जमा करावी.स्पर्धकाने प्रवास खर्च व निवास खर्च स्वतः करावयाचा आहे.तसेच COVD – ​१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.स्पर्धा परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार संपूर्णतः स्पर्धा आयोजन समितीचा असेल.
तरी ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे.त्यांनी   प्रा.तानाजी गोदडे – ९९२१५१३८८४,प्रा.प्रकाश शिंदे -७५१७०६९१३२,प्रा.वसीम सय्यद – ७९७२०६३३६२,प्रा.नयन उगले – ९४०५४२४४६० त्यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन स्पर्धा समिती प्रमुख प्रा.तानाजी गोदडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!