कणकवली ब्रिज खाली लावलेला डंपर गेला चोरीस

कणकवली ब्रिज खाली लावलेला डंपर गेला चोरीस

*कोकण Express*

*कणकवली ब्रिज खाली लावलेला डंपर गेला चोरीस*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली उबाळे मेडिकल समोरील उड्डाण पुलाखाली लावलेला गंधार सदानंद बाणे यांच्या मालकीचा डंपर (क्र. एम. एच ०७ सी-६३०८) – असून रात्री चोरीस गेला आहे. भर कणकवली शहरातून हा डंपर चोरी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

सदर डंपरच्या समोरील बाजूस सफेद कलर असून मागील होदा भगव्या कलर असलेला आहे. त्या डंपरच्या काचेवर श्री. गांगो भैरी, ब्राह्मणदेव प्रसन्न, नमो भालचंद्राय दत्तकृपा असे रेडियमने लिहिलेले आहे. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जर हा उपर कोणाला दिसला असेल तर त्यानी मालक श्री. बाणे मो. ९४२३३००४९६ किंवा कणकवली पोलीस ठाण्यात यांना तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!