*कोकण Express*
*कासार्डेत महात्मा गांधी तंटामुक्त समीतीच्या अध्यक्ष पदी संजय नकाशे यांची निवड*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कासार्डे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी संजय विठ्ठल नकाशे याची बिनविरोध निवड करण्यात आली. कासार्डे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच निशा विद्याधर नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते,माजी जि.प. सदस्य संजय देसाई ,माजी सरपंच संतोष पारकर, मावळते तंटामुक्तअध्यक्ष राजकुमार पाताडे, खरेदी विक्री संघ संचालक श्रीपाद पाताडे, कासार्डे विकास मंडळाचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, सोसायटी चेअरमन दीपक सावंत,रविंद्र पाताडे,ग्रा.पं.सदस्य आदी उपस्थित होते. दरम्यान संजय नकाशे यानी या आधीही तंटामुक्त अध्यक्ष काम केल्यानतंर पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून या निवडीअंती त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. कासार्डे गाव तंटामुक्त समितीचा वेगळा ठसा उमटवून नागरीकांना अभिप्रेत काम करणार असल्याचे श्री. नकाशे यानी सांगितले