*कोकण Express*
*फोंडाघाट मधील दहावी पास बोगस डॉक्टरला माजी सभापती मनोज रावराणे यांनी दिले पकडून*
*बोगस डॉक्टर विरोधात तक्रार करून, शासनाने डॉक्टर व मेडिकलची लायसन्स तपासावी असे आव्हान नागरिकांनी केले आहे*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट परिसरात मागील काही वर्षांपासून स्वतः डॉक्टर असल्याचे सांगत फोंडाघाट ग्रामपंचायतीला खोटी कागदपत्रे सादर करून येथील
रुग्णांवर उपचार करून त्याच्या जीविताशी खेळणारा व कित्येकांना लाखो रुपयाचा गंडा घालणारा तथाकथित दहावी पास बोगस डॉक्टर
विश्वास बित्तम याचा कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांनी परदाफाश केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे, दहावी पास बोगस डॉक्टर विश्वास वित्तम हा मूळचा कोल्हापूर रंकाळा येथील असून एका मेडिकल मध्ये औषधे विक्रीचा अनुभव पाठीशी घेऊन दुसऱ्याच्या फर्मासिस्ट लायसन वर सुरुवातीला मेडिकल चालवणारा मात्र त्यात ही यश न आल्याने या भामट्याने आपला मोर्चा फोंडाघाट गावाकडे वळवत फोंडाघाट ग्रामपंचायत आणि येथील लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात धुळफेक करून मागील काही वर्षांपासून फोंडाघाट गांगीवाडी येथे राहून फोंडाघाट, लोरे, वाघेरी, घोणसरी, हरकुळ व परिसरातील रुग्णांनवर वैद्यकीय उपचार करत होता. त्याच्या उपचारा दरम्यान कित्येकांना आराम पडण्याऐवजी इतर दुष्परिणामाना समोरे जावे लागले. किंबहुना घोणसरी येथील रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याचे खात्री लायक वृत्त आहे मात्र असे असूनही याबाबत कोणीही कोठेही तक्रार केलेली नसल्याने आणि बोगस डॉक्टर बोलण्यात पटाईत असल्याने त्यांच्या वर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती तसेच या बोगस डॉक्टर ने आपल्या रुग्णांकडून व इतर ओळखीच्या माणसांकडून लाखो रुपये जमा केले असून त्यांचे पैसे देण्याचे टाळाटाळ करत सध्या है तथा कथित डॉक्टर सर्वांपासून लपून फिरत होते.
दरम्यान लोरे येथील काही रुग्णांकडून या बोगस डॉक्टराने काही रक्कम घेऊन फसवणूक केल्याची माहिती कणकवली माजी सभापती मनोज रावराणे व त्यांच्या सहकाऱ्यांना *मिळाल्यानंतर या डॉक्टर ला पेशंट बनून कॉल केल्यावर आपल्याला नवीन शिकार भेटल्याने हा बोगस डॉक्टर लोरे नं. 1 येथे आल्यावर मनोज रावराणे आणी सहकाऱ्यांनी तो बोगस डॉक्टर असल्याचे कबूल करून घेत ज्याची रक्कम त्याने घेतली होती ती परत करावयास लावली.
दरम्यान हा फक्त दहावी पास बोगस डॉक्टर फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये खोटी कागद पत्रे देऊन फोंडाघाट परिसरात डॉक्टरी व्यवसाय करून येथील नागरिकांच्या जीवाशी खेळतो तरीही फोंडाघाट ग्रामपंचायत ची याबाबत कोणतीही तक्रार नाही ? फोंडाघाट परिसरात दहावी पास बोगस डॉक्टर विश्वास बित्तम डॉक्टरी व्यवसाय करून या पेशाचे नाव खराब करत असताना या परिसरातील एकही डॉक्टर ची तक्रार नाही ? आणि एरव्ही सामाजिक प्रश्नावर सदैव जागरूक असणारे येथील विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, नागरिक यांचीही तक्रार नाही ? याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून या ज्या रुग्णांची फसवणूक झाली असेल अशानी या बोगस डॉक्टर विरोधात तक्रार करावी तसेच शासनाने या परिसरातील डॉक्टर व मेडिकल ची लायसन्स तपासावी असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे