आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर

आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर

*कोकण Express*

*आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर*

*29 ऑगस्ट रोजी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक*

सिंधुदुर्ग – आम आदमी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक 29 ऑगस्ट रोजी गोपुरी आश्रम सभागृह वागदे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. अमित पालेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिली आहे.

यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश संगठन सचिव डॉ. रियाज पठाण आणि संदीप देसाई, रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे उपस्थित राहणार आहेत.

अलीकडेच आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी गोवा येथे अ‍ॅड. अमित पालेकर यांची भेट घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येण्याची विनंती केली. अ‍ॅड. अमित पालेकर यांनी येण्याचे मान्य करत जिल्हा कार्यकारिणी सभेला उपस्थित राहण्याचा शब्द देखील दिला आहे. अ‍ॅड. अमित पालेकर हे सण 2022 मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे गोव्यातील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती. अ‍ॅड. अमित पालेकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात आम आदमी पक्षाने मोठी भरारी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वात गोव्यात आम आदमी पक्षाने विधानसभेच्या दोन जागा बहुमताने जिंकल्या आहेत. अ‍ॅड. अमित पालेकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी अत्यंत जवळचे ऋणानुबंध आहेत. त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी या ठिकाणी निश्चितपणे होईल असे विवेक ताम्हणकर यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान आम आदमी पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!