तिमिरातुनी तेजाकडे समुहातील विद्यार्थी, श्री. सच्चिदानंद कृष्णा राऊळ यांची भारतीय टपाल विभागात पोस्टमन पदी निवड झाल्याबद्दल सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत सत्कार

तिमिरातुनी तेजाकडे समुहातील विद्यार्थी, श्री. सच्चिदानंद कृष्णा राऊळ यांची भारतीय टपाल विभागात पोस्टमन पदी निवड झाल्याबद्दल सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत सत्कार

*कोकण Express*

*तिमिरातुनी तेजाकडे समुहातील विद्यार्थी, श्री. सच्चिदानंद कृष्णा राऊळ यांची भारतीय टपाल विभागात पोस्टमन पदी निवड झाल्याबद्दल सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत सत्कार*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

तिमिरातुनी तेजाकडे ही महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी एकमेव शैक्षणिक चळवळ स्वरुपात प्रसिद्ध असून विविध शैक्षणिक संकुलात, विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संदर्भात अविरतपणे सामाजिक कार्य सुरू आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत व पारदर्शक प्रशासनाचा भाग बनावे यासाठी विविध माध्यमातून निःशुल्क मार्गदर्शन प्रदान केले जाते.

तिमिरातुनी तेजाकडे या समुहातील विद्यार्थी, श्री. सच्चिदानंद कृष्णा राऊळ, मुक्काम पोस्ट आंजीवडे (भाकरवाडी), तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांची वर्ष २०२१ मध्ये झालेल्या भारतीय टपाल विभागाच्या परीक्षेत सिंधुदुर्ग या विभागासाठी पोस्टमन पदावर निवड झाली. जिद्द व चिकाटी बाळगून त्यांनी टपाल विभागाच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्याबद्दल प्रख्यात प्रेरणादायी व्याख्याते, उच्चविद्याविभूषित सिंधूपुत्र व भारत सरकारच्या मुंबई सीमाशुल्क विभागात सेवेत असणारे अनुवाद अधिकारी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत शाल व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी तिमिरातुनी तेजाकडे या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, श्री सचिन यशवंत रेडकर, श्री. मंदार मालंडकर, ध्रुव गुप्ता उपस्थित होते. अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेला हा विद्यार्थी असून स्वयंअध्ययनाने हे यश संपादन केले. हे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांबाबत उदासीनता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!