*कोकण Express*
*वाचन संस्कृती पासून उदयोन्मूख पीढी दूर जाऊ नये यासाठी वाचनिय सिहित्य*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
लहान वयापासून मुलांच्या अंगी वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कासार्डे येथिल ज्ञानमंदिर वाचनालयातर्फे जि.प. प्राथमिक शाळा कासार्डे जांभूळवाडी शाळेच्या मुलांना वाचनीय वाङ्मय साहित्य पुस्तकाचे वितरण मोफत करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डाॅ. अरविंद कुडतरकर, उपाध्यक्ष अशोक मुद्राळे, सचिव अविनाश सावंत,मुख्याध्यापिका हजारे मॅडम, शिक्षिका मुंडले मॅडम, ग्रंथपाल अक्षता सावंत आदी उपस्थित होते.
वाचन संस्कृतीपासून उदयोन्मुख पिढी दूर होत चालल्याने मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हीवी यासाठी ज्ञानमंदिर वाचनालय तर्फे स्तुत्य उपक्रम राबवला जात असल्याने सर्वच स्तरावर कौतुक होत असून यानिमित्त शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.