*कोकण Express*
*कणकवली दिवाणी न्यायालय येथे ९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत*
*सहभागी होण्याचे आवाहन*
तालुका विधी सेवा समिती कणकवली तर्फे दिवाणी न्यायालय कणकवली येथे शनिवार दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आलेले आहे.
पक्षकारांच्या हितासाठी ही लोक अदालत होणार आहे. त्यातून त्यांना कमी वेळात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची दिवाणी, फौजदारी कौटुंबिक व पोटगी इत्यादी प्रकरणे तसेच म.रा. वि. वि. कंपनी, बी.एस.एन.एल. वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत आदी जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करून करून वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यावी यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहावे कोणत्याही पक्षकारास व वकील यांना न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये लोकअदालतीपुर्वी आपले प्रकरणांची पूर्वबोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास त्यांच्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधितानी दिवाणी न्यायालय कणकवली येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री. टी. एच. शेख (अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती कणकवली तथा दिवाणी न्यायाधीश, (क. स्तर), कणकवली) व श्री. एम. बी. सोनटक्के, (सहदिवाणी न्यायाधीश, (क. स्तर), कणकवली) यांनी केले आहे.