*कोकण Express*
*सिंधुदुर्ग माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल राणे…*
*बिनविरोध निवड; जिल्हा सचिवपदी गजानन नानचे…*
*वेंगुर्ला;ता.१७:*
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी अनिल राणे तर जिल्हा सचिव पदी गजानन नानचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची पंचवार्षिक निवडणूक ओरोस येथील जिल्हा माध्यमिक पतपेढी सभागृहात सिंधुदुर्गनगरी येथे घेण्यात आली या निवडणुकीमध्ये सर्व पदाधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून जिल्हा अध्यक्षपदी अनिल राणे श्री माऊली विद्या मंदिर रेडी, जिल्हा सचिव गजानन नानचे शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा, उपाध्यक्ष धनश्री गावडे हिवाळे हायस्कूल, उपाध्यक्ष गोपाळ चौकेकर चौके हायस्कूल, सुहास देसाई पिकुळे हायस्कूल, बी बी चव्हाण कार्याध्यक्ष, प्रदीप सावंत सहसचिव असरोंडी हायस्कूल, पांडुरंग दळवी राज्य प्रतिनिधी अंब्रड हायस्कूल, सुनील नाईक जिल्हा प्रतिनिधी तुळसुली हायस्कूल, रामा गवस उसप हायस्कूल, शर्मिला गावकर महिला सदस्य कुडाळकर हायस्कूल मालवण, गोपाळ हरमलकर खजिनदार कसाल हायस्कूल, गजानन गवस सदस्य उंबर्डे हायस्कूल, श्याम पाताडे सदस्य एस एम हायस्कूल कणकवली, अर्जुन शेटकर सदस्य भेडशी हायस्कूल, लाडू जाधव सदस्य कोलगाव हायस्कूल, गजानन मांजरेकर देवबाग हायस्कूल, रघुनाथ चव्हाण सदस्य पांग्रड हायस्कूल, सदानंद गुरव कनेडी हायस्कूल, बी.डी गोसावी सल्लागार, एस के सावंत सल्लागार, आप्पा ठाकूर सल्लागार, आनंद लोके सल्लागार, बाबी लोंढे कोनाळकट्टा हायस्कूल सल्लागार, यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी पांडुरंग दळवी हे निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले यावेळीयावेळी जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरची कार्यकारणी निवड माध्यमिक पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोनाविषाणू च्या महामारी मध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना तसेच निधन झालेले शिक्षकेतर कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मान्यवरांचे स्वागत आप्पा ठाकूर यांनी केले.