*कोकण Express*
*खेडेकरांना क्लीन चिट मिळाल्यास नवल वाटेल – महेश नलावडे*
सध्या राजकारणात महाराष्ट्रासहित देवगड मधील होत असलेले बदल लक्षात घेता…राजकारणात काहिही अशक्य नाही हेच दिसून येते…मागील काही दिवसात उ.बा.ठा.गटाचे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्र तेच्या फैरी पाहता आज अचानक पणे शिवसेनेत नगराध्यक्षा सह प्रवेश केल्यावर देवगडवासीय संभ्रमात आहेत,आरोप झाल्यावर वैचारिक बदल घडल्याचे या आधी ही सर्वांनी पहिलं आहे,यावेळी नगरसेवक रोहन खेडेकर यांच्यावरील आरोप सिध्द होणार का की त्याना क्लीन चिट मिळणार याचा अभ्यास देवगड वासीय करतील ही माफक अपेक्षा आहे… एवढं मात्र निश्चित आज आम्हीच अभिमानाने सांगु शकतो की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात सर्वसामान्य जनतेला न्याय देत आहोत…..