जमीनमोजणीवेळी दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांची निर्दोष मुक्तता

जमीनमोजणीवेळी दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांची निर्दोष मुक्तता

*कोकण Express*

*जमीनमोजणीवेळी दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांची निर्दोष मुक्तता*

*संशयतांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद*

भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीचा हद्द ठराव करतेवेळी मिळकतीत अनाधिकारे प्रवेश करून जमीनमालक महादेव सूर्यकांत राणे (रा. टेंबवाडी, कणकवली) यांना दगडाने मारहाण केली. तसेच त्यांचा मित्र दिनेश मधुसूदन जैतापकर (रा. अंधेरी- मुंबई) यांना दांड्याने मारहाण करत फ्रैक्चर केल्याप्रकरणी आरोपी तानाजी भाऊ सावंत, मकरंद अशोक राणे, अशोक भास्कर राणे, मानसी मकरंद राणे, प्रवीण श्रीधर सावंत व नूतन विनायक सोहनी यांची येथील सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. २९ जानेवारी २०१९ रोजी शहरातील टेंबवाडी येथील फिर्यादी महादेव राणे यांच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे भूमापक हे मोजणी करत असताना आरोपींनी मोजणी मान्य नसल्याने बेकायदा जमाव करून फिर्यादीच्या छातीवर डाव्या बाजूला चिऱ्याचा दगड मारला. तसेच त्याच्यासोबत असलेला मित्र दिनेश जैतापकर यांच्या हात, पायावर दांड्याने मारून त्यांच्या पायाचे हाड फ्रेंक्चर केले. तसेच आरोपींनी हातपाय तोडून ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. याबाबत आरोपीविरुद्ध भादंवि कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, कोणताही विश्वासार्ह सबळ पुरावा न आल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!