कणकवली तालुक्यातील तलाठ्यांकडून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन घ्यावी

कणकवली तालुक्यातील तलाठ्यांकडून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन घ्यावी

*कोकण Express*

*कणकवली तालुक्यातील तलाठ्यांकडून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन घ्यावी*

*तलाठी उपब्धतेबाबत दर्शनी भागावर उपस्थितीचे वेळापत्रक प्रसिद्ध करावे; युवासेनेची कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या कडे मागणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तलाठ्यांकडून शासनाच्या आदेशाचे पालन करून

सर्वसमान्य जनतेला तलाठी उपलब्ध व्हावेत, यासाठी शानानाने तलाठ्यांना सजामध्ये उपस्थित राहण्याचे (शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ९१/ई-१० दि. १८/०८/२०२३) आदेश दिले आहेत. ज्या तलाठ्यांकडे एकापेक्षा जास्त सर्जेचा कार्यभार दिलेले आहेत. त्या सर्व तलाठ्यांनी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय येथे दर्शनी भागावर उपस्थितीबाबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्यापही कणकवली तालुक्यातील तलाठ्यांनी सदर शासन आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. कणकवली तालुक्यातील तलाठ्यांकडून शासनाच्या आदेशाचे अमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे युवा सेना जिल्हाप्रमुख सुजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यांनी केली आहे. तसेच आपलाही याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा येत्या १५ दिवसात युवासेनेमार्फत आंदोलन छेडण्यात

येईल, असा इशारा सुशांत श्रीधर नाईक जिल्हाप्रमुख, युवासेना सिंधुदुर्ग यानी दिला आहे..

यावेळी अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मज्जीद बटवाले, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका संघटक नितेश भोगले, अनुप वारंग, महेश कोदे, फोड़ा विभागप्रमुख सिद्धेश राणे, निसार शेख, जावेद पाटणकर, गौस पाटणकर, इमाम नावलेकर आदीसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!